
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी रविवारचा दिवस ‘घातवार’ ठरला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल क्षमतेपेक्षा अधिक भारामुळे कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण गंभीर जखमी झाले, तर ५२ जणांना वाचवण्यात एनडीएआरएफच्या पथकाला यश आले आहे. या आपत्तीत अनेक जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची भीती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.